कळमना येथील पेट्रोल पंपला आग

0
1228

कळमना येथील पेट्रोल पंपला आग

 

 

कळमना येथील पेरमिल डेपोला आज रविवार दि २२ मे ला दुपारी २ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागून करोडो रुपयांचे बांबू व निलगरी जाळून खाक झाल्याचा प्रकार घडला.आग लागण्याचे कारण कळू शकते नाही.मात्र डेपोच्या जवळच पेट्रोपंप होता त्याची झळ पेट्रोल पंप पर्यंत पोहचणार नाही यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असताना आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही.आणि हळूहळू आगीचा विस्तार वाढला व डेपोजवळ असलेला साची पेट्रोलपंप सायंकाळी सात वाजता आगीच्या भक्षस्थानी आला.पेट्रोल पंपावर आग लागताच त्याचा स्फोट झाला.आग इतकी भयानक होती की बल्लारपूर -कोठारी या राष्ट्रीय महामार्गावर डेपो असल्याने व आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या भयंकर भीषण झळाचे लोट उसळत होते.धुरांचे लोट निघत असल्याने संपूर्ण परिसर धुराने झाकला असल्याने महामार्गावरील रहदारी थांबविण्यात आली होती.

 

 

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना- लावारी चोरमोडी च्या जंगलात अचानक सकाळी ११.०० वाजताचे दरम्यान वनवा पेटला असता वनविभागाच्या पथकाने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तप्त उन्हामुळे व हल्ल्यामुळे आग पसरत गेली.

 

 

जंगलातील वनव्याची दाहक्ता पेपर मिल ने साठवणूक केलेल्या बांबू, सुबाभुळ, निलगिरी च्या डपोला लागली. या घटनेची माहिती डोपो कर्मचाऱ्यांनी पेपर मिल प्रशासनास दिली. घटनची माहीती समजताच अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कसोशीने प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात आली नाही.

 

 

आगीची दाहकता वाढत असल्याने पोलिस प्रशासनाने राज्य महामार्गावरील वाहतूक बंद केली. यामुळे चंद्रपूर- अहेरी मार्गाची कोंडी निर्माण झाली आहे. वाहण चालक , प्रवाशांचे वाहतूक कोंडीने हाल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here