बल्लारपूर-कोठारी राज्य महामार्गावर पेपर मिलच्या लकडा डेपोला भिषण आग

0
748

बल्लारपूर-कोठारी राज्य महामार्गावर पेपर मिलच्या लकडा डेपोला भिषण आग

 

 

राज जुनघरे, कोठारी
बल्लारपूर तालुक्यातील बल्लारपूर- कोठारी राज्य महामार्गावर बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू, सुबाभुळ, निलगीरी डेपोला दुपारी ४.०० वाजताचे दरम्यान भिषण आग लागली. जवळपास शंभर एकरात डेपो असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. यात पेपरमिल प्रशासनाचा बांबू, सुबाभुळ, निलगीरी असा लाखों टन लकडा जळून खाक झाला आहे. यात पेपरमिल प्रशासनाचे कोट्यावधी चे नुकसान झाले असून जवळच लागुन असलेल्या पेट्रोल पंपा पर्यंत आग पसरली आहे. या मुळे मोठी दुर्घटना घटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आगीची दाहकता लक्षात घेता पोलिस प्रशासनाने राज्य महामार्गावरील वाहतूक बंद केली असून अहेरी- चंद्रपूर मारगाची वाहतूक विस्कळित झाली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचा ताफा प्रयत्न करीत असुन संपूर्ण रात्र भरात आग आटोक्यात येईल किंवा नाही याची शाश्वती नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here