गोंडपिपरी तलावाजवळ जवळ ऍटो पलटला

0
2226

गोंडपिपरी तलावाजवळ जवळ ऍटो पलटला

एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

गोंडपीपरीतील तलाजवळ बलारशहा मार्गावर आज दुपारी १ वाजता MH 34 D 6123 आटो. हायवा ला ओव्हरटेक मारताना पलटला त्यात पियुष देऊळगरे या जनता महाविध्यालयात शिकणाऱ्या १५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.
तालुक्यातील करंजी येथील सचिन वाढइ याच्या मालकीच्या आटोने प्रवाशांना गोंडपीपरि वरून करंजी नेत असताना सदर आटो हायवाला ओव्हरटेक मारताना पलटला त्यात सर्व प्रवाशी करंजी येथील होते.एका १५ वर्षीय पियुष देऊळगरे युवकाचा जागीच मृत्यू झाला.तर या अपघातात करंजी येथील सोनी गणपत आत्राम वय (१०),चंद्रकला बावणे वय (६०) ,रामजी मरसकोल्हे माजी पोलीस कर्मचारी हे जखमी झाले असुन घटनास्थळी हायवे पोलीस पीएसआय देवळे,गोंडपीपरिचे ठाणेदार संदीप धोबे यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरित दाखल केले.एकुलता एक मुलगा गेल्याने करंजीत हळहळ व्यक्त केल्या जात आहे.पुढील तपास गोंडपीपरि पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here