हरदोना येथे ‘अक्षय’ ने सुरु केली “ज्ञानाची शाळा”
प्रवीण मेश्राम : कोरोना महामारी व लॉकडॉउन मुळे गावे, शहरे बंद आहे. शाळाही बंद आहे. त्यामुळे गावातील चिमुकले घरात आणि परिसरात खेळताना दिसतात. त्याना कोनी न सांगणारे व बोलणारे आशा वेळी बालकाना सस्कारचे धड़े तर नक्कीच कोवळ्या मनावर सकारात्मक परिणाम होतात. सामाजिक व विविध खेळाची जाणीव असणाऱ्या अशाच एका तरुनाने गावातील चिमुकल्याना एकत्र करुण राजुरा तालुक्यातील हरदोना गावात हनुमान मंदिर परिसरात ज्ञानशाळा सुरु केली. ज्ञानशाळेत ज्ञानाचे झरे पाझरु लागले. हरदोना येथेल शेतकरी कुटुबात घरी अठराविस्व दरिद्राची तमा न बाळगता अक्षय टेकाम (23) या तरुनाचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. अक्षय टेकाम हा चन्द्रपुर येथील सुशीला बाई रामचन्द्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालयत शिक्षण घेणारा विद्यर्थि नेहमी सामाजिक चळवळीत सक्रिय असतो. गावात आल्यानंतर लॉकडॉउन मुळे मुलाच्या शाळा बंद असल्याने मुले एकडे तिकडे फिरतना व खेळताना त्याला जानवले. आपल्या शिक्षणाचा व उपयोग या दरम्यान मुलासाठी व्हावा असे त्याच्या मनात आले. त्यासाठी त्यानी गावातील मुलाना शिकवन्याचे ठरवले. कोरोनाच संकट लक्षात घेऊन आई वडिलांची परवानगी लक्षात घेऊन त्याने हा उपक्रम सुरु केला. या साठि त्यांनी गावातील प्रतिष्टित नागरिकची व गावचा सरपंचा ची परवानगी घेतली व अक्षय ची ज्ञानशाळा सुरु झाली.
