जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध रेती तस्करीवर छापा : खनिज विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

0
559

जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध रेती तस्करीवर छापा : खनिज विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

चंद्रपूर, दि. 20 नोव्हेंबर : जिल्ह्यात आज दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी चार ठिकाणी जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या भरारी पथकाने छापा टाकून अवैध रेती वाहतुकीतील ट्रक व रेतीसाठा जप्त केला आहे.

जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या भरारी पथकाने दुपारी 1 वाजता मौजा कोठारी ता. बल्लारपुर येथे में. सुयोग ट्रान्सपोर्ट, राजुरा, यांच्या ट्रकवर छापा मारून अवैध रेती वाहतूक पकडली. सदर वाहानावरील वाहतूक पासेसची तपासणी करण्यात आली असता छत्तीसगड राज्य येथील बनावट वाहतूक पासद्वारे अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनात आले. अवैध रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक में. सुयोग ट्रान्सपोर्ट, राजुरा येथील राजू धोटे यांच्या मालकीचा असल्याची माहिती वाहानचालकाने दिली आहे. सदर फूल बॉडी ट्रक क्र. एम.एच -34 अेबी 6363 जप्त करण्यात आला आहे.

तसेच गोंडपिपरी तालुक्यातील मौजा विठ्ठलवाडा येथील शरद गायकवाड यांचे शेतात अंदाजे 100 ब्रास अवैध साठवणूक केलेली रेती, येनबोथला येथील सरकारी जागेवरील 500 ब्रास रेती, तारसा येथील स्मशान भूमिवरील अंदाजे 150 ब्रास अवैध सावठवणूक केलेली रेती जप्त करण्यात आली आहे.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्ह्यात सभाव्य गौण खनिज चोरी होणार्‍या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍या व्याक्तीवर व वाहानावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलम 48 च्या तरतुदीअन्वये कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here