मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची दखल

0
418

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची दखल

अतिवृष्टीने घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना आता 5 हजारा एैवजी मिळणार 15 हजारांची शासकीय मदत

 

 

अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मिळत असलेली 5 हजार रुपयांची शासकिय मदत अत्यंत कमी असुन ती वाढविण्यात यावी अशी मागणी पावसाळी अधिवशेनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याची तात्काळ दखल घेत सदर मदत 5 हजाराहुन 15 हजार करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
यंदाचा पावसाळा चंद्रपूरकरांसाठी मोठे संकट घेउन आले. या पावसाने आलेल्या पुरानेझ अनेकांची शेतपिके पाण्या खाली गेली तर शहरातील अनेक घरांची पडझड झाली. त्यामुळे सदर कुटुंब उघड्यावरती आले. सदर घरांचे पंचनामे करुन त्यांना शासकिय मदत करण्यात आली. मात्र यातील अनेक घरे ही नजुलच्या जागेवर असल्याने त्यांना केवळ पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही मदत अत्यंत कमी आहे. त्यामुळे सदर पिढीत कुटुंबांना वाढीव मदत देण्यात यावी अशी मागणी काल अधिवेशनाच्या दिस-या दिवशी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असुन आज बोलतांना त्यांनी सदर पिढीत कुटुंबांना मिळणारी पाच हजार रुपयांची मदत वाढवून 15 हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here