रासायनिक खत दर वाढ विरोधात कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्रजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शरदभाऊ जोगी यांच्या नेतृत्वात निषेध

0
463

रासायनिक खत दर वाढ विरोधात कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्रजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शरदभाऊ जोगी यांच्या नेतृत्वात निषेध

प्रवीण मेश्राम : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ, तसेच नुकतीच “रासायनिक खतांच्या” किंमतीत केलेली 40% दरवाढीच्या निषेधार्थ तहसिल कार्यालया समोर ” शेतकऱ्यांचा एकच नारा रासायनिक खतांची दरवाढ कमी करा “किसानो के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे” “महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल “मोदी हटाओ किसान बचाओ “बेशरम मोदी होश मे आओ जनता से तुम ना टकराओ” असे नारे देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रासायनिक खतांच्या किमती ४० टक्के नी वाढविल्या. त्यामुळे मागील एक वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे,शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच कंबरड मोडण्याचे काम केले आहे ,ही दरवाढ तात्काळ कमी करण्याच्या मागणी साठी केंद्र सरकार विरोधात निषेध करण्यात आला. यावेळी अरुनजी निमजे राजुरा विधानसभा प्रमुख,. शरद भाऊ जोगी .तालुका अध्यक्ष कोरपना. रफिक निजामी माजी जिल्हाउपाध्यक्ष,आबिद अली, प्रविण काकडे जिल्हासचिव, सुनिल अरकीलवार जिल्हाउपाध्यक्ष, प्रविण मेश्राम तालुका सचिव, करणसिंग भुराणी तालुका उपाध्यक्ष, आकाश वराटे युवक शहराध्यक्ष, प्रविण कोल्हे शहराध्यक्ष, सदानंद गिरी, मयुर एकरे, वैभव गोरे, मुनीर शेख इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here