अवैध रित्या दारुची विक्री करणाऱ्याला अटक

0
509

अवैध रित्या दारुची विक्री करणाऱ्याला अटक

वणी (यवतमाळ) मनोज नवले
दुचाकीवरून अवैध रित्या दारुची विक्री करणाऱ्या युवकाला वणी डी बी पाथकांनी अटक केली. बाबू विश्वानाथ गोलपेल्लीवार असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे. बाबू हा दुचाकीवरून दारुची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती डिबी पथक प्रमुख आनंद पिंगळे यांना मिळाली. माहितीच्या आधारे पिंगळे यांनी आपल्या पथकासह सापळा रचुन भगतसिंग चौक येथे दुचाकी क्र. MH 29 BA 2799 ची झळती घेतली असता त्याच्याजवळून विदेशी कंपनीची 16,315 रुपायची दारू व दुचाकी असा एकूण 56315 रु मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी दुचाकी चालक बाबू गोलपेल्लीवार (36) यास विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नी. श्याम सोनाटक्के यांचे मार्गदर्शनात स. पो. नी. आनंद पिंगळे. नायक. पो.कॉ. हरिद्र कुमार भारती व डिबी पथक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here