यवतमाळ जिल्ह्यातील दुःखद घटना…!

0
1241

यवतमाळ जिल्ह्यातील दुःखद घटना…!

आठवी पास तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर ; उड्डाण घेण्यासाठी इंजिन सुरू करताच घडली दुर्दैवी घटना

वणी, मनोज नवले : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शे इस्माईल शे इब्राहिम (24) याने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते. तर मागील दोन वर्षापासून इस्माईल हा हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता. हळू हळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. त्याने  मंगळवारी (ता.10) बनविलेल्या हेलिकॉप्टर ची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. यात हेलिकॉप्टर फॅन तुटला आणि त्याचा यात मृत्यू झाला.

 

 

इस्माईलचे केवळ आठवीपर्यंत शिक्षण

इस्माईल हा पत्राकारागिर होता.  त्याला एक भाऊ आणि एक बहीण मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर तर वडील घरीच असतात इस्माईल हा शेख इब्राहिम यांचा दुसऱ्या नंबरचा मुलगा!

 

 

घरची परिस्थिती जेमतेम. इस्माईल हा पत्रकारागिर असल्याने तो अलमारी कुलर असे विविध उपकरणे बनवत होता. इस्माईल हा फक्त आठवा वर्ग शिकलेला होता. पण एक दिवस त्याला काय सुचले त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले. आणि त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरु झाला. हळूहळू एक एक पार्ट तयार करू लागला आणि दोन वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. आणि मंगळवारी 10 ऑगस्टच्या रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. इंजिन सुरू केले इंजिन 750 अम्पियर वर फिरत होते. सर्व व्यवस्थित सुरू होते. पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईल च्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईल चा  मृत्यू झाला. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो त्याच्या आणि त्याच्या गावाला जगा पर्यन्त नाव करणायचे पण इस्माईलचे स्वप्न अर्धवटच राहिले.

 

आणि फुलसावंगीच्या रँचोचा ट्रायल दरम्यान मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here