बगडखिडकी परिसरातील ज्वलंत समस्या त्वरीत साेडवा ! मनपा आयुक्तांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे निवेदन

0
459

बगडखिडकी परिसरातील ज्वलंत समस्या त्वरीत साेडवा ! मनपा आयुक्तांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे निवेदन

🟧🌀💠🟪चंद्रपूर🟧🌀💠🟪किरण घाटे💠जिल्हा प्रतिनिधी🟪🟧
मनपा आयुक्त यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव मो. कादर शेख यांच्या नेतृत्वात भानापेठ प्रभागातील बगड खिडकी परिसरातील विविध ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक निवेदन आज सादर करण्यांत आले.

🟪🟢🟡🟣🟥🟨💠🟨🟧चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरातील नालीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. मागील काही वर्षापासून नालीची पाहणी व देखरेख करण्यासाठी कोणीही आलेले नाही. मनपा व नगरसेवकांच्या दुर्लक्ष मुळे बगड खिडकी परिसरातील नुरी चौक, येथील रहवासी अजीम शेख, मजीद शेख, जाकीर शेख, जावेद शेख, जहांगीर बॅग, नजीर शेख, यांच्या घरासमोरील असलेलीं नाली पूर्णपणे तुटलेली आहे. नालीच्या दुर्गंधी पाण्यामुळे घाण पसरलेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना स्वास्थ संबंधी अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. बगड खिडकी परिसरातील नागरिकांची मागणी आहे की, महानगरपालिका ने त्वरित नालीची दुरुस्ती करावी .
चंद्रपूर शहरात पाण्याची बिकट समस्या आहे.पाण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. विशेष करून या परिसरातील नळ कनेक्शन खूप कमी आहे. तसेच परिसरातील मनपाकडून लावण्यात आलेले हात पंप (बोरिंग) बिघडलेले अवस्थेत आहे.🟣🟥🟩🟨🟡💠🟪🟧🟣🟧 या परिसरातील बिघडलेल्या अवस्थेत असलेल्या हात पंप (बोरिंग) लवकरात लवकर दुरुस्त करुन देण्यांत यावे.💠🌀🟢🟩🟧🟡🟣🟥🟪या शिवाय बगड खिडकी परिसरातील विद्युत खांब वरील पथदिव्यांची सोय करून देण्यात यावी. माेठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेल्या बगड खिडकी परिसर शहराच्या मध्यभागी आहे. तसेच या प्रभागातून रेल्वेलाईन लागून आहे.सदरहु परिसरामध्ये पथदिवे नसल्याने चोरी अथवा अवैध धंद्यांना उत येत आहे. 🟥🟪🟣🟡🟩🟢गुंड प्रवृत्तीचे लोक या वस्तीत फिरताना दिसतात. 🟣💠🟪🟧🟥🟩🟡🟢🟨उपराेक्त परिसरामध्ये अवैध धंदे व असामाजिक तत्त्व यांचे लोकांमध्ये भय निर्माण झालेले आहे. रात्री फिरत असताना या परिसरात काळाकुट्ट अंधार पसरलेला असतो.त्यामुळे असामाजिक तत्त्व या परिसरामध्ये अंधाराच्या गैरफायदा उचलत आहे. लोकांमध्ये असुरक्षेचे व भीतीचे वातावरण परिसरातील लोकांमध्ये पसरलेले आहे. उपरोक्त विषयांकित मागणी बाबत त्वरित पावले उचलून पथ दिव्यांची सोय लवकरात लवकर करून देण्यात यावी अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.🟧💠🟪🟣🟢🟡🟣🟩🟥तदवतचं या संदर्भात
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव, मोहम्मद कादर शेख यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस विधानसभा सचिव मोनू रामटेके, प्रकाश देशभ्रतार, अजीम शेख,जावेद शेख, मजीद शेख, सलमान पठाण, शाकीर शेख, गौरव आमटे यांनी या मागणी बाबतचे एक निवेदन आयुक्तांना आज दिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here