बिग ब्रेकिंग न्यूज़ ; वैनगंगा नदीत नाव उलटली

0
567

बिग ब्रेकिंग न्यूज़ ; वैनगंगा नदीत नाव उलटली

तालुक्यातील वाघोली येथील ३ मुलींचा वैनगंगा नदी मध्ये बुडून करूण अंत

चामोर्शी, सुखसागर झाडे : आंबे तोडण्या करिता वैनगंगा नदी पार करून जात असताना मध्यंतरी नाव पलटी झाल्याने नावे वर असलेल्या तीनही मुली नदीच्या पात्रात बुडून मृत्यूमुखी पडल्या. तर नाव चालवणारा नावाडी पसार झाला असून चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका अंतर्गत जूनासुरला येथे असल्याचे समजते.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सोनी मूकरू शेंडे, सम्रुधी ढिवरु शेंडे दोन्ही राहणार वाघोली तहसील चामोर्शी जिल्हा गडचिरोली तर पल्लवी रमेश भोयर, राहणार येवली तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलींची नावे आहेत.

या तीन मुलीपैकी सोनी मूकरू शेंडे ही विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थीनी असून ती यावर्षी आठव्या वर्गात होती.

नावाडी केवट राम शेंडे हा मृत्युमुखी पडलेल्या मुलींचा काका असल्याचे समजते. नाव पलटी झाल्यावर त्यांनी या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी या मुलींना मरताना सोडून आपली सासरवाडी जूनासुर्ला येथे पळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. माहितीनुसार असे कळते की पाच मुली मिळून आंबे तोडण्याकरिता गेल्या होत्या. परंतु नावे मध्ये पाचही मुली एकाच वेळेस नावेत जाऊ शकत नसल्यामुळे दोन मुली तीरावर राहिल्या. त्यांना त्या तीरावर सोडून परत नावाडी या दोघींना नेण्याकरिता येणार होता. परंतु जातानाच हा अपघात झाल्याने तीरावर असलेल्या दोन्ही मुलींनी हंबरडा फोडला. मात्र तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता.सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेवाडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, म. पो. उपनि. पल्लवी वाघ मॅडम.पो.ह.3266 गणपलवार पो.शि. तांगडे, सक्री राठोड यांनी घटना स्थळ गाठून मोका चौकशी केली.शवविच्छेदन करून आकस्मिक मर्ग दाखल करून संबंधित नातेवाईकांना शवे सुपुर्द करण्यात आली.पुढील तपास ठाणेदार चामोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.नि.पल्लवी वाघ मॅडम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here