तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये नांदाफाटा येथील एकलव्य इंग्लिश स्कूल अव्वल

0
376

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये नांदाफाटा येथील एकलव्य इंग्लिश स्कूल अव्वल

संजित मसे व पूर्वा वासेकर या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक

कोरपना प्रतिनिधी
नुकतीच ५० वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्व. भाऊराव पाटील चटप आश्रमशाळा गडचांदूर येथे पार पडली. यामध्ये एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल नांदाफाटा येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून यश संपादित केले.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी कोरपना तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक १०, ११ व १२ जानेवारी २०२३ ला स्व.भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा गडचांदूर येथे आदिवासी व गैर आदिवासी अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये कोरपना तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या.

शैक्षणिक साहित्यातील उच्च प्राथमिक विभागातील गैर आदिवासी क्षेत्रामधील गटामध्ये एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल नांदाफाटा या शाळेने सहभाग नोंदविलेला होता. यामध्ये संजित प्रशांत मसे व पूर्वा पंढरीनाथ वासेकर या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘अप्लिकेशन ऑफ ट्रिगोनामेट्री’ या प्रतिकृतीने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.

यावेळी कोरपना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रुपेशजी कांबळे, विस्तार अधिकारी सचिन मालवी, केंद्रप्रमुख पंढरीनाथ मुसळे, एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक प्रा.आशिष देरकर, मुख्याध्यापक नितेश शेंडे यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका संध्या पिंगे, स्नेहल लोढे, शिक्षक अमित वाघमारे यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवून उज्वल यश मिळवण्याचा संकल्प संजित मसे व पूर्वा वासेकर या विद्यार्थ्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here