सर्व धर्मीय स्थळी प्रार्थंना करत चंद्रपूरच्या आ. किशाेर जाेरगेंवारांनी केला आपला वाढदिवस साजरा
🟡🛑🟣🟢चंद्रपूर । किरण घाटे🟡🛑🟣🟢
🟢🛑🟣चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज वाढदिवसा निमीत्त शहरातील सर्व धर्मीय प्रार्थनास्थळी भेट देत प्रार्थना करत आपला वाढदिवस साजरा केला.
🟢🛑🟣🟡दरवर्षी प्रमाणे यंदाही आ. किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसासनिमीत्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सर्वप्रथम आ. जोरगेवार यांनी सर्व धर्मीय प्रार्थनास्थळी भेट देत प्रार्थना केली. यावेळी त्यांनी चंद्रपूरची महाराष्ट्रातील प्रख्यात आराध्य दैवत माता महाकाली (महाकाली मंदिर,) गुरुद्वारा, बुद्ध विहार, जमनजट्टी दर्गाह, आंद्रिय चर्च या ठिकाणी प्रार्थना करत आजच्या दिवसाची सुरुवात केली. त्यांनतर त्यांच्या वाढदिवसा निमीत्त आयोजित पूढील कार्यक्रमांना थाटात आरंभ झाला.