राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राजुरा येथे विविध कार्यक्रम
राजुरा__ १२ जानेवारी २०२३ मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा च्या वतीने सावित्री – जिजाऊ दशरात्रोत्सव व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश पारखी, मार्गदर्शक म्हणून मोनिका राजगडकर (एमपीएससी उत्तीर्ण राज्य कर निरीक्षक) व प्रमुख अतिथी म्हणून सरिकाताई जाधव, जिजाऊ ब्रिगेड राजुरा व मनिषाताई चटप राजुरा ह्या होत्या. मोनिका राजगडकर यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी करावा लागलेला संघर्ष व अतिशय अवघड परिस्थितीत कुटुंब असताना जिद्दीने परिश्रम करून मिळवलेले यश व कुटुंबाचे समाजाचे मिळालेले सहकार्य तसेच परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षिय मार्गदर्शन करताना दिनेश पारखी यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,फातिमा शेख व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली. सद्य परिस्थितीत विद्यार्थ्यांनी संविधानिक जबाबदाऱ्या व जागरूकता याविषयी अधिक माहिती घ्यावी.निव्वळ अभ्यास म्हणजे जीवन नसून त्यासोबत संस्कारही मह्त्वाचे असतात व ते महापुरुषांच्या जीवन चरित्रातून मिळतात हे सांगितले.कार्यक्रमात मान्यवरानी आपापले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी साळवे यांनी केले.संचालन मधुकर डांगे यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर मटाले यांनी केले.