25 कोटी रुपयातुन वढा तीर्थक्षेत्राचा होणार दैदिप्यमान विकास

0
88

25 कोटी रुपयातुन वढा तीर्थक्षेत्राचा होणार दैदिप्यमान विकास

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून वढा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर

विदर्भातील पंढरपूर समजल्या जाणा-या वढा तिर्थक्षाचा विकास करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता. यासाठी शासन दरबारी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या या पाठपूराव्याला यश आले असुन सदर विकासकामासाठी पहिल्या टप्यात 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून वढा तीर्थक्षेत्राचा दैदिप्यमान विकास होईल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूरातील माता महाकाली मंदिर आणि वढा येथील विठ्ठल रुखमाई मंदीराचा विकास करण्याच्या संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी दुस-र्या टप्यात ७५ कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली आहे. तर वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात जवळपास ४५ कोटी रुपये मंजुर झाले होते. यातील २४ कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. विदर्भातील पंढरपुर म्हणुन ओळख असलेल वढा तिर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असुन या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले होते.
वढा येथे वर्धा – पैनगंगा नदीचा संगम आहे. दोन पवित्र नदयांचा संगम हा धार्मिक दृष्याही पावण असून याचे महत्त्व अधिक आहे. या ठिकाणी भाविकांची श्रद्धा जूळली असल्याने येथे येणा-या भाविकांसाठी योग्य सोयी सुविधा झाल्या पाहिजेत या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. पंढरपुर आणि वढा या तीर्थक्षेत्रात साम्य आहे. या दोन्ही ठिकाणची विठ्ठलाची मुर्ती ही स्वयंभु आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीला येथे भरत असलेल्या यात्रेलाही आता भव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे येथे येणा-या भाविकांची योग्य सोय येथे व्हावी यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनातही आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा तिर्थक्षेत्राच्या विकासाचा विषय उपस्थित करत या मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सदर विकासकामासाठी पहिल्या टप्यात 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसा जिआरही शासनाच्या वतीने प्रकाशी करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजिद पवार यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here