राजुरा तालुक्यातील रस्त्यावरील जीवघेण्या खड्डे व धुळीमुळे प्रवाशांचा जीवाला धोका

0
388

राजुरा तालुक्यातील रस्त्यावरील जीवघेण खड्डे व धुळीमुळे प्रवाशांचा जीवाला धोका

रस्त्यालगतच्या ट्रान्सपोर्टमुळे वाहतुकीची कोंडी, जनतेत रोष

राजुरा राजुरा तालुक्यातील रस्त्यात महाकाय जीवघेणे खड्डे पडले असुन रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्याने जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आता पर्यन्त या रस्त्यावरून ये जा करतांना अनेक अपघात घडले आहे. काही प्रवाशांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. आतातर सास्ती, रामपूर, गडचांदूर कडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या अनेक ट्रान्सपोर्ट पुढे वाहनाचा जमाव उभा राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. बेकोलीच्या कोळसा खाणींकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक खेडे बसलेले असून सास्ती,रामपुर गोवरी, मात्र, पोवनी, साखरी, यासह इतर गावाकडे जाणाऱ्या गावालगतच्या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक सुरू असते. कोळसा भरलेल्या गाड्या सुसाट वेगाने जात असल्याने रस्ता पूर्णपणे उखडला आहे. संपूर्ण रस्त्यात महाकाय खड्डे पडले आहे. त्यात रोजाना अपघातात वाढ होत आहे.

त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे, याच मार्गाने नदी पट्टयातील जनता ये जा करीत असते. त्यांना प्रवास करतांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना याअगोदर अनेक लहानमोठे अपघात घडले आहे. काही दिवसांपूर्वी खड्यात पडल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. हे सर्वश्रुत असताना याकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष दिसत आहे.

खड्यासोबतच गावकऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतआहे. रस्त्यालगतच्या घरांमध्ये धुळीचा स्तर साचत असल्याने खोकला, दमा सारखे रोगांची भीती आहे.या संदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले पण अधिकाऱ्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता गावकरी सुध्दा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत दिसू लागले आहे.

या मार्गावरून कोळशाची जड वाहतूक सुरू असल्याने रस्त्यात मोठमोठे खड्डे पहले आहे. रस्त्यालगतच्या ट्रान्सपोर्ट पुढे वाहनांच्या रांगा उभ्या राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे त्यामुळे हा रस्ताच अपघातालाआमंत्रण देत असल्याने जड वाहतूकीचा मार्गबदलावा व रस्त्यावर पाण्याचा फवारा करावा. भर रस्त्यावरील वाहने हटवावे यासाठी संबंधीत विभागाने आता याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे

राजुरा तालुक्यातील रस्त्यात महाकाय जीवघेणे खड्डे पडले असुन रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्याने जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आता पर्यन्त या रस्त्यावरून ये जा करतांना अनेक अपघात घडले आहे. काही प्रवाशांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. आतातर सास्ती, रामपूर, गडचांदूर कडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या अनेक ट्रान्सपोर्ट पुढे वाहनाचा जमाव उभा राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here