हृदयद्रावक घटना…! युवा शेतकऱ्याची आत्महत्या

0
1727

हृदयद्रावक घटना…! युवा शेतकऱ्याची आत्महत्या

 

विरुर स्टे./राजुरा, 23 जुलै : युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी उघडकीस आली. राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन जवळील कविटपेठ येथील अमित अनिल मोरे (22 वर्ष) युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात शेतपिके फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आज सकाळी शेतकरी आपल्या शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. काल सायंकाळीच सदर युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण शेतपिकांचे नुकसान झाले. या नैराशेतून सदर युवा शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेत आपली जीवनयात्रा संपविली असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती विरुर पोलिसांना देण्यात आली असून वृत्त लिहितोस्तवर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून उत्तरीय तपासणीसाठी शव राजुरा येथे हलविण्यात येत आहे.

शेतीच्या कर्जापायी घरातील कर्त्या युवा शेतकऱ्याचा नाहक बळी गेला असल्याने त्याच्या कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here