महिला व बालरुग्णालयामध्ये नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भोजन दान

0
408

विश्व हिंदू परिषद (बजरंग दल) गडचिरोली तर्फे सेवा-सुरक्षा- संस्कार हे मुख्य उद्देश्य ठेवून भोजन वाटप

 

✍️सूखसागर झाडे गडचिरोली 

गडचिरोली- कोरोना काळात सर्वत्र बंद असताना दवाखान्यात भरती असलेल्या बाहेर गावातील रुग्णांच्या नातेवाईकांची खूप अडचण होताना दिसून येत आहे. ते पन खास करून शनिवार आणि रविवार जिथे पूर्णपने लाकडाऊनमुळे हॉटेल्स, ऑटोसेवा, खानावळ इत्यादी संपूर्ण बंद असतात. त्याचा विचार करून मागील काही दिवसापासून विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दल गडचिरोली नगर च्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक शनिवार ला महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे भोजनदान, फळे, व मास्क वाटप करण्याचे उपक्रम निस्वार्थपने राबवित आहेत.

संघठन चे मुख्य उद्देश्य सेवा – सुरक्षा – संस्कार हेच आहे आणि त्या साठी आम्ही सदैव तत्पर राहू असे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

दि.२६ जुन रोजी महिला व बाल रुग्णालयात नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भोजन दान वाटप करण्यात आले.विशेष अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. सोयाम सर उपस्थित होते. नगराध्यांनी संगठनेच्या या उपक्रमाची प्रशंसा केली व लोकसेवा हीच सर्वात मोठी सेवा असल्याचे सांगितले.

विश्व हिंदू परिषद गडचिरोली नगर अध्यक्ष नितेश खडसे यांनी सर्व सहभागी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले तसेच युवक – युवतींना स्वइच्छेने लोकसेवे मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here