गावोगावी लसीकरण जनजागृती अभियान…!

0
458

हरडे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.पवन र नाईक यांचा चामोर्शी तालुक्यातील गावोगावी लसीकरण जनजागृती अभियान

 

डॉ.प्रा.पवन नाईक रोसेयो अधिकारी यांचा कौतुकास्पद उपक्रम

 

✍️सुखसागर झाडे चामोर्शी

 

मागच्या वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त डॉ. पवन रमेश नाईक केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक रासेयो गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात अनेक गावोगावी जाऊन कोव्हीड – १९ च्या संदर्भात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेत फार मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे.

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोकांच्या मनात लसीकरणा बद्दल गैरसमज आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डॉ. पवन रमेश नाईक हे दररोज संध्याकाळी गावोगावी प्रोजेक्टर द्वारे व्हिडिओ आणि लाईव्ह चित्रफित दाखवून लोकांच्या मनातील गैरसमज आणि भीती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ज्यांनी अजून पर्यंत कोरोनाची लस घेतली नाही त्यांनी कोणत्याही प्रकारचे गैरसमज आणि भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन डॉ. पवन रमेश नाईक यांनी केले.

या संपूर्ण कार्यात केवळरामजी हरडे महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक देखील त्यांच्यासोबत कार्यरत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here