खरवाडी येथे कोविड लसिकरन शिबिर

0
594

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे 

   

अमरावती /चांदूर बाजार (कृष्णापुर):- चांदूरबाजार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तलवेल अंतर्गत येत असलेल्या खरवाडी येथे दिनांक 26 जुन रोजी कोविड लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली,या शिबिराचे उद्घाटन ग्राम पंचायत सदस्य सौ प्रमिला भोवते व सरपंच सौ. प्रतिभा बंड यांनी छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करोना प्रतिबंधक लस सर्वप्रथम माजी सैनिक सुरेश भोवते यांनी घेऊन शुभारंभ केला.कोरोणा प्रतिबंधक लस मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे.त्यादृष्टीने गावातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सरपंच सौ.प्रतिभा बंड यांनी वैद्यकीय अधिकारी यांना पत्र लिहून खरवाडी येथे कोविड लसीकरण शिबिर घेण्यात यावे म्हणून पत्र दिले होते. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा खरवाडी येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.या लसीकरण मोहिमेत 144 लोकांनी लाभ घेतला.यावेळी पोलिस पाटील नारायणराव ढवळे,उपसरपंच सागर शिंगाडे,ग्राम पंचायत सदस्य विजयराव तंतरपाले ,संतोष भुरे,राजेश अडाऊ, मुख्याधापक संजय ठाकरे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नीरज सवाई,आरोग्य सेवक बिजवे,आरोग्य सेविका ,आशा वर्कर सौ.सुनीता चोपडे,सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here