किरकोळ वादातुन युवकाचे डोके फोडले…!

0
409

निलंगा पोलिस ठाण्यात ८ जणाविरोधात गुन्हा दाखल

 

 

 प्रतिनिधी/बाबूराव बोरोळे

निलंगा : शेतातील बांध का फोडला म्हणून विचारणा केली असता आठ जणांनी दगडाने व काडीने मारून डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन येथील तुळशीराम बब्रूवान पवार वय २३ कलूबाई बब्रूवान पवार या मुलाने व आईने आमचा बांध का फोडला असे विचार असता त्यांचे शेताचे शेजारी आरोपी बब्रूवान, विश्वनाथ पवार, माधव बळीराम कदम, तुकाराम गंगाराम कदम, संग्राम गंगाराम कदम, बालाजी माधव कदम, अमित संग्राम कदम, रोहित संग्राम कदम, तानाजी तुकाराम कदम, प्रशांत तुकाराम कदम, शिवाजी माधव कदम या आठ जणांनी काल सकाळी ९ वाजता अंबुलगा मेन शिवात गट नंबर ६० शेतातील बांध फोडून वरील दोघांना काठीने व दगडाने जबर मारहाण केली आहे.

 

जखमीवर निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार चालू असून डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. बाळासाहेब बब्रूवान पवार यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिस ठाण्यात विविध कलामान्वय गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस कर्मचारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here