स्वर्णलीला शाळेचा 100 टक्के निकाल… मुलाने राखले अव्वल स्थान…

0
573

स्वर्णलीला शाळेचा 100 टक्के निकाल… मुलाने राखले अव्वल स्थान…

 

वणी परिसरातील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. तेथील आदित्य लांबट या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत 98.20 टक्के घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

 

 

स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा दरवर्षी 100 टक्के निकाल असतो व ती यशाची परंपरा कायम आहे. यावर्षी132 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. या मध्ये आदित्य लांबट 98.20 टक्के गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. द्वितीय श्रेया पिदूरकर हिला 97.60 टक्के, तृतीय पूजा राजूरकर हिला 94.60 टक्के गुण प्राप्त झाले आहे. विध्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन रेड्डी, प्राचार्या व्ही. सौम्या, उपमुख्यध्यापक मंगेश आवारी व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here