चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड मुक्त विभागातील संपूर्ण शाळा सुरू करा

0
497

चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड मुक्त विभागातील संपूर्ण शाळा सुरू करा

इंन्डिपेंडट इंग्लिश स्कूल असोसिएशन ची पत्रकार परिषदेत शासनाकडे मागणी

पोंभुर्णा प्रतिनिधी :- शासनाने शैक्षणिक वर्ष २०२१/२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वि ते १२ वि वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड मुक्त भागातील शाळा सुरू करा अशी मागणी इंन्डिपेंडट इंग्लिश स्कूल असोसिएशन ने पत्रकार परिषदेत केली आहे.या बाबतचे निवेदन तहशीलदार पोंभुर्णा यांच्याकडे दिले आहे.

 

 

मागील दिड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थी घरीच असल्यामुळे त्यांची शारीरिक वाढ होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.यामुळे काही विद्यार्थी मानसिक आजारी असल्याचे दिसून येत आहे.विद्यार्थांचे आँनलाईन क्लासेस सुरू असल्याने मोबाईल फोन च्या अति वापरामुळे दुष्परिणाम देखील समोर येत आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सुरू करणे अंत्यंत आवश्यक आहे.कोविड चे सर्व नियम पाळुन कोविड मुक्त विभागातील शाळा सुरू करा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. पत्रकार परिषदेत प्रशांत हजबन जिल्हा अध्यक्ष इंन्डिपेंडट इंग्लिश स्कूल असोसिएशन, संदिप ढोबळे जिल्हा सचिव इंन्डिपेंडट इंग्लिश स्कूल असोसिएशन, रमेश सातपुते जिल्हा सदस्य व असंख्य शाळा संस्थापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here