कोठरी येथील दारू विक्रेत्यांकडून ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
456

कोठरी येथील दारू विक्रेत्यांकडून ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सुखसागर झाडे

चामोर्शी तालुक्यातील अडपल्ली येथील ठोक अवैध दारू विक्रेत्याने कोठरी येथील एका व्यक्तीच्या घरी अवैधरित्या दारूचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती मिळताच गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोठरी येथून ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

अडपल्ली येथील ठोक दारू विक्रेता विपुल चक्रवर्ती यांने कोठरी येथील दिवाकर भिस्सु मिसा यांचे राहते घरी चिल्लर विक्री करीता अवैध देशी दारू साठा करून ठेवला आहे अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व जवानांनी घोट पोलीस मदत केंद्रातील जवानांना सोबत घेऊन कोठरी येथील आरोपी दिवाकर मिच्चा यांच्या घरून ६४ हजार रुपयांची दारू जप्त केली असून त्यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here