गट ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असलेल्या मौजा इरई ते भारोसा या अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करा

0
749

गट ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असलेल्या मौजा इरई ते भारोसा या अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करा

सामाजिक कार्यकर्ते निखिल पिदूरकर यांची मागणी

कोरपणा/प्रतिनिधी : कोरपणा तालुक्यातील गट ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असलेल्या मौजा इरई ते भारोसा हा रस्ता २.७० किलोमीटर असुन २०१८ ते २०२० या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर खनिज विकास निधी अंतर्गत ९० लक्ष रु.निधी मंजूर झाला होता.परंतु मौजा इरई ते भारोसा हा रस्ता फक्त १ किलो.मी. पूर्ण होऊन उर्वरित १.७० अजून पण पूर्ण झाला नसून या मार्गाने वाहतूक करण्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करत तारेवरीची कसरत करत प्रवास कराव लागत आहे.

 

मौजा इरई येथे जिल्हा परिषद शाळा फक्त इयत्ता ५ वी पर्यंत असून पुढील शिक्षणासाठी यास मार्गाने नाहक त्रास सहन करत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भारोसा येथे इयत्ता ६ ते ८ पर्यंत शिक्षण घेत असून विध्यार्थीच्या उजवल भविष्य लक्षात घेता आणि इरई येथील नागरिकांना होत असलेल्या त्रास मुळे मी निखिल पिदूरकर सामाजिक कार्यकर्ता सर्व विध्यार्थी व समस्त इरई ग्रामवासी याच्या वतीने आज दिनांक २०/०७/२०२1 रोज मंगळवार तहसीलदार कोरपणा याच्या मार्फत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपूर, पालकमंत्री विजयभाऊ वेडेट्टीवार खासदार बाळू भाऊ धानोरकर, आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माझी अर्थमंत्री व वनमंत्री, आमदार सुभाष भाऊ धोटे राजुरा विधानसभा क्षेत्र यांना निवेदन देण्यात आल त्या वेळेस इरई येथील सुनील तेलंग, संजय भगत, बाळू तेलंग व प्रथम तेलंग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here