जन शिक्षण संस्थान चंद्रपूर 2 येथे कोरोणाची दुसरी लाट आणि घ्यावयाची काळजी व लसीकरण याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम

0
460

जन शिक्षण संस्थान चंद्रपूर 2 येथे कोरोणाची दुसरी लाट आणि घ्यावयाची काळजी व लसीकरण याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम

 

नागेश नेवारे- बल्लारपूर,चंद्रपूर

 

 

   दिनांक 16 जुलै 2021 रोजी जन शिक्षण संस्थान चंद्रपुर दोन येथे 15 जुलै ते 30 जुलै दरम्यान चालत असणाऱ्या स्वच्छता पंधरवडा याचे औचित्य साधून कोरोना ची दुसरी लाट आणि त्यामध्ये घ्यावयाची काळजी व लसीकरण याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम आणि विविध असणारे पूर्वग्रह या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोरोना समुपदेशन केंद्र यामध्ये कार्यरत असलेले व शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदावर रुजू असलेले माननीय तानाजी शिंदे आणि माननीय राजरत्न केळकर उपस्थित होते. सोबतच जन शिक्षण संस्थान चंद्रपूर दोन येथील सर्व कर्मचारी तथा प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्वप्निल चिकटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here