डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणा-यांना कठाेर शिक्षा करा!

0
587

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणा-यांना कठाेर शिक्षा करा!

आँल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाधिका-यांना निवेदन!

चंद्रपूर । किरण घाटे

बिड जिल्ह्यातील अंबाजाेगाई तालुक्यातील बदापूर येथील डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याची विटंबना करणां-या आराेपींना हुडकुण काढुन त्यांचेवर शासनाने कठाेर कारवाई करावी अशी मागणी आँल इंडिया पँथर सेना चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने काल गुरुवार दि.२९आँक्टाेबरला एका लेखी निवेदनातुन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे कडे करण्यांत आली.
अलिकडे महिलांवरील अत्यांचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत असुन अश्या घटनेतील नराधमांना कठाेर शिक्षा करावी अशी मागणी सुध्दा या निवेदनात नमुद करण्यात आली आहे. डाँ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबन प्रकरणात लवकरात लवकर पाेलिसांनी आराेपींचा शाेध घ्यावा जर पाेलिसांनी त्वरीत आराेपींचा शाेध घेतला नाही तर या बाबत आंदोलन छेडण्यांचा इशारा प्रशासनाला या निवेदनातुन देण्यात आला आहे.सदरहु मागणीचे निवेदन सादर करतांना चंद्रपूर जिल्हा पँथर सेनेचे सिध्दार्थ शेंडे , आशिष बाेरेवार , स्वप्निल वालदे , स्नेहल गाेंगले , अनिकेत खाेब्रगडे , भीम आर्मीचे राहुल बांबाेडे ,अंजली पाटील व इत्तर युवक कार्यकर्ते हजर हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here