प्राध्यापकाने केला पत्नीला फाशी देण्याचा प्रयत्न – पंख्याला अडकवलेली दोरी तुटल्याने वाचले प्राण

0
720

प्राध्यापकाने केला पत्नीला फाशी देण्याचा प्रयत्न – पंख्याला अडकवलेली दोरी तुटल्याने वाचले प्राण

लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच दाखविले क्रौर्य – पत्नीने दाखल केली पोलिसात तक्रार

 

 

राजुरा येथिल एका प्राध्यापकाने पैशासाठी चक्क आपल्या पत्नीला फासावर अडकवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असुन घटनेची तक्रार पिडीत पत्नीने पोलिसांना दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक मंगेश कुळमेथे ह्यांचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. सुरुवातीला कुटुंब एकत्र होते मात्र काही दिवसांनी सासु, सासरे व दिर जवळच वेगळे राहू लागले. मात्र अवघ्या चार महिन्यातच प्राध्यापक पती मंगेश कुळमेथे पैशासाठी तगादा लावू लागला. दरम्यान एकदा पत्नीने माहेरून दोन लाख रुपये आणुन दिलं मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने वडिलांना जास्त पैसे देणे शक्य नव्हते.

दिनांक 14 सप्टेंबर रोजी माहेरून पैसे आणण्यासाठी पती पत्नी मधे वाद झाला. दरम्यान शेजारीच राहणारे सासरे व दिर घरी आले व त्यांनी दमदाटी करून पैसे आणण्यास सांगितले. त्याच रात्री जवळपास एक वाजण्याच्या सुमारास दारू प्यायलेल्या प्राध्यापक पतीने पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली व आपल्या वडील व लहान भवास बोलावून घेतले. वाद विकोपाला जाऊन प्राध्यापक पती, सासरे व दिर ह्यांनी पंख्याला दोरी बांधून पीडितेला पलंगावर खुर्ची ठेऊन त्यावर उभे करून फासावर अडकवले व सर्व लोक समोरच्या खोलीत जाऊन बसले मात्र दैव बलवत्तर असल्याने पंख्याला अडकवलेली दोरी तुटल्याने अघटीत घडले नाही.

अखेर भेदरलेल्या महिलेने मागच्या दाराने घराबाहेर पळ काढला व पहाटे पर्यंत राजुरा बस स्थानकावर दडून बसली व सकाळ होताच माहेरी गेली. मात्र त्यावेळी तब्येत बरी नसल्याचे आईवडीलंना कारण देऊन घरी आल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूर येथे गेली असता आपल्या बहिणीला आपबिती सांगुन अखेरीस 18 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसात तक्रार दाखल केली असुन अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक साखरे ह्यांच्या नेतृत्वात सुरू असून 307, 498 (अ), 504, 34 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here