झाडीपट्टी नाटकांसाठी बाबूपेठ येथे खुले रंगमंच उभारावे – आ. किशोर जोरगेवार

0
340

झाडीपट्टी नाटकांसाठी बाबूपेठ येथे खुले रंगमंच उभारावे – आ. किशोर जोरगेवार

सांस्कृतीक मंत्री अमित देशमूख यांना मागणी, भेट घेत केली चर्चा

राजु झाडे

चंद्रपूर:- झाडीपट्टी नाटकांच्या माध्यमातून स्वतातील कलेचे प्रदर्शन करत जनजागृती करण्याचे काम कलावंताकडून केले जाते. मात्र या नाट्य प्रकाराकडे प्रशासनाचे नेहमी दुर्लक्ष झाले. परिणामी झाडीपट्टी नाटकातील कलावंत आजही उपेक्षीत राहिला आहे. मात्र आता हि परिस्थिती बदलविण्याची गरज असून या कलावंतांना रंगमंच उपलब्ध करुन दिल्यास कलांवतासह समाजालाही त्याचा उपयोग होईल असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले असून झाडीपट्टी नाट्य प्रयोगासाठी बाबूपेठ येथे खुले रंगमंच उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांना केली आहे.

काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात त्यांची भेट घेतली असून विदर्भातील झाडीपट्टी नाटक संस्कृती आणि त्यातून होणारी जनजागृती याबाबत त्यांना माहिती दिली. यावेळी आ. जोरगेवार यांनी सदर मागणीचे पत्रही सांस्कृतीक मंत्री अमित देशमूख यांना दिले.

ग्रामीण भागातील कलावंत झाडीपट्टी प्रकारचे नाटकांचे प्रयोग करत करत समाजात जनजागृतीचे काम करत आहे. मात्र या कलावंताची आर्थिक परिस्थिती सुदृढ नसल्यामुळे त्यांना हया नाटकांचे प्रयोग शहरातील मोकळया जागेवरती करावे लागतात. शासनाकडुन नाटकात काम करणा-या कलाकरांना कसल्याच प्रकारची मदत आजपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे झाडीपट्टी नाटक संस्कृती ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपुर येथील बाबुपेठ वार्ड हा अधिक लोकसंख्या असलेला भाग आहे. येथील रहिवासी हे लोकनाटकांचे प्रेमी आहेत. परंतु सध्या त्यंाना नाटक सादर करण्याकरीता मंच उपलब्ध नाही.

याकरीता सदर खुल्या रंगमंचाचे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून झाडीपट्टी रंगभुमी टिकवणे शक्य होईल. चंद्रपूर जिल्हयात भव्य असे सांस्कृतिक खुले रंगमंचाचे सभागृह उभारण्याकरीता 4 कोटी 46 लक्ष रूपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. समाजाला दिशा देणारी झाडीपट्टी नाट्य संस्कृती टिकल्यास याचा समाजालाही लाभ होईल असेही या निवेदनाच्या माध्यमातून आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here