गोदावरी अर्बन कडून आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा…..

0
453

गोदावरी अर्बन कडून आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा…..

वणी (यवतमाळ), प्रतिनिधी : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को -ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड, शाखा वणी शाखेकडून आंतरराष्ट्रीय न्याय दिवसा निमित्य दिनांक 17 जुलै 2021 रोजी वणीतील निवृत्त न्यायाधीश तसेच दिग्गज वरिष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला.

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लि नांदेड आपल्या सर्व ग्राहकांना तत्पर व उत्कृष्ट सेवा देण्याकरिता नेहमीच अग्रगण्य राहिली असून, त्यासह सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक क्षेत्रात सुद्धा, सामाजिक सेवा करीत मानाचा तुरा रोवत आहेच. संस्थापकीय अध्यक्ष हेमंत पटिल साहेब, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटिल, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनात गोदावरी अर्बन विविध शाखे मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.

दिनांक 17 ला वणी शाखे कडून आंतरराष्ट्रीय न्याय दिवसानिमित्य वणीतील निवृत्त न्यायाधिश ऍड. वसंता कावडे तसेच वणीतील दिग्गज वरिष्ठ अधिवक्ता (वकील) ऍड. रजा हुसैन हैदरी, ऍड विनायकरावजी एकरे, ऍड ज्ञानेश्वरजी कातकडे, ऍड अमोल गौरकार यांचा सत्कार गोदावरी परिवाराकडून करण्यात आला. यावेळी वणी शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here