नगर परिषद ब्रह्मपुरी येथील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात मृत झालेल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ केला तेरवीचा कार्यक्रम

0
528

नगर परिषद ब्रह्मपुरी येथील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात मृत झालेल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ केला तेरवीचा कार्यक्रम

 

ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी/ज्ञानदीप भैसारे

 

चंद्रपूर/ ब्रह्मपुरी:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक लोकांचा बळी घेतला. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील मृतांच्या आकडयांपेक्षा दुसऱ्या लाटेतील मृतांची आकडेवारी जास्त होती. ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आणि “वेळ आली नव्हती पण काळा आला” या म्हणीप्रमाणे कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुण लोकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला. ब्रह्मपुरी तालुक्यांमध्ये सुद्धा अनेक नागरिक कोरोणाला बळी पडले. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांना अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे सोपविता येत नव्हते त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील कोरोनामध्ये मृत झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ब्रह्मपुरी नगर परिषदेचे आरोग्य विभागातील कोरोना वारियर्स यांनी केला आणि अतिशय वाईट परिस्थितीत सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाने मृत झालेल्यांवरती ब्रह्मपुरी येथील स्मशानभूमीत अतिशय योग्य पद्धतीने सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले.

कोरोना काळात कोराणाने मृत झालेल्यांचे आप्तेष्ट बनून नगर परिषद ब्रह्मपुरी येथील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ज्याप्रमाणे अंत्यसंस्कार केला त्याचप्रमाणे आज दिनांक १६/०७/२०२१ रोजी कोरोनाने मृत झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी आप्तेष्टांप्रमाणेच तेरावीचा कार्यक्रम ठेवला. त्यानुसार भारतीय प्रथा परंपरा प्रमाणे सर्व विधी आटोपण्यात आले. संबंधित २० कर्मचाऱ्यांनी सकाळी ८.०० वा. वैनगंगा नदीवर जाऊन पिंडदान केले व त्यानंतर सायंकाळी ४.०० वाजता घनकचरा व्यवस्थापन केंद्र ब्रह्मपुरी येथे भोजनदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी मा. दूधरामजी बेंद्रे शिपाई न.प. ब्रह्मपुरी, मा. गणेश जुगनाके शिपाई न.प. ब्रह्मपुरी, मा‌. भीमराव जनबंधू चौकीदार घनकचरा व्यवस्थापन केंद्र ब्रह्मपुरी तसेच सत्यवान येलपुरे , श्रीकांत प्रधान, संजय लांजेवार व इतर सर्व आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here