गरजू विद्यार्थ्यांस आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचा मदतीचा हात

0
458

गरजू विद्यार्थ्यांस आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचा मदतीचा हात

तालूका प्रतिनिधी
चिमूर

तालुक्यातील खडसंगी येथील एका गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात निर्माण झालेली अडचण लक्षात घेता आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी आर्थिक मदत केली आहे.

खडसंगी येथील हलाखीच्या परिस्थिती असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी शुभम सुबोध ठाकुर या विद्यार्थ्यांला शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही कैफियत त्याच्या कुटुंबियांनी भाजप कार्यकर्ते ग्रा.प.सदस्य मणी रॉय यांच्या माध्यमातून आमदार भांगडीया यांच्या सामोरे मांडली.
दरम्यान त्या गरजू विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी त्या विदयार्थ्यांला आर्थिक मदत जाहीर केली. आमदार भांगगडीया यांच्या निवासस्थानी भाजप महिला आघाडीच्या पायल कापसे यांच्या हस्ते ही मदत करण्यात आली.
या वेळी रमेश कंचरलावर, मनी रॉय,हरीश पिसे,माया नन्नावारे,गीता लिंगायत इत्याती उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here