पुरोगामी पत्रकार संघ आता राष्ट्रीय पातळीवर काम करणार – राज्य अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांची माहिती

0
714

पुरोगामी पत्रकार संघ आता राष्ट्रीय पातळीवर काम करणार – राज्य अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांची माहिती

मालेगाव : पुरोगामी पत्रकार संघ आजपर्यंत राज्य पातळीवर कार्य रत होता.पत्रकारांना काम करताना येनाऱ्या अडचणी, कोरोना काळात मृत पावलेल्या सभासदांना आर्थिक मदत, पत्रकारांवरील हल्ले,पत्रकार वसाहत, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, पत्रकारांचा गौरव तसेच अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून प्रामुख्याने रक्तदान शिबिर आयोजित करून भरीव योगदान दिल्याने याची दखल देश पातळीवर घेण्यात आली. आता पुरोगामी पत्रकार संघ राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे प्रत्येक सभासदांच्या जबाबदारीत वाढ झाल्याचे तसेच संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

 

हे वृत्त मालेगाव येथे येताच राज्य उपाध्यक्ष प्रकाश चीतळकर, राज्य संघटक ज्ञानेश्वर बागुल, तालुका सचिव शेखर सोनवणे यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच हे वृत्त आल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे ज्ञानेश्वर बागुल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here