महावितरण तर्फे सक्तीची वीज बिलाची वसुली व शेतातील वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा थांबवा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0
469

महावितरण तर्फे सक्तीची वीज बिलाची वसुली व शेतातील वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा थांबवा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

 

सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भावाने लॉकडाउनच्या कालखंडात सर्वसामान्य जनतेला झालेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करणे गरजेचे.

 

हिंगणघाट / अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

 

 

         कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले असून महावितरण तर्फे सक्तीची वीज बिलाची होत असलेली वसुली व शेतातील वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा थांबविण्याबाबतची मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मागील १५ महिन्यापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊनच्या कालखंडात शेतकरी,शेतमजूर,कामगार, व्यापारी ,गोरगरीब जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले असून अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सरकारने वीज बिल माफ करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे लोकांनी वीज बिल भरले नाही आणि त्यानंतर सरकारने वीज बिल माफ न केल्यामुळे सर्वसामान्य जनता हताश झाली असून “हातावर आणून पानावर खाणाऱ्या” सह आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

मागील पाच वर्षापासून सतत होणारा दुष्काळ आणि सण २०२० मध्ये पडलेल्या भयानक दुष्काळामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे.सन २०२१ चा खरिपाचा हंगाम मृग नक्षत्रात सापडला असून शेतकऱ्यांनी टोबणे व पेरणी सुरू केली आहे. जवळपास ८० टक्के शेतामध्ये शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते,मजुरीचे पैसे देण्यासाठी सावकार च्या घरी चकरा मारत आहे. तर दुसरीकडे बँकांनी पीक कर्जाचा वाटप पूर्णपणे न केल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सन २०२० मध्ये जिल्ह्याची जानेवारी ४७ टक्के घोषित केली असतानासुद्धा सरकारने जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले नाही. तसेच सन २०२० मधे शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असताना सोयाबीन व कपाशीचे पीक निस्तानाभूत झाले असताना शुद्ध पिक विमा जाहीर झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे.

मुलांची शिक्षण फी, परिवाराची जबाबदारी, शेतीचा खर्च, ठप्प पडलेला व्यापार इत्यादी आर्थिक घडीचा सामना सर्व सामान्य नागरिकांना करतांना फटका बसला आहे.

महावितरणाच्या वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्याकडून शहरातील थकबाकीदार, ग्रामीण भागातील थकबाकीदार व शेतीचे वीज कनेक्शन जबरदस्तीने कापल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी,शेतमजूर,कामगार, व्यापारी व सर्वसामान्य गोरगरीब जनता हताश झाली आहे.

तरी सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भावाने लॉकडाउनच्या कालखंडात सर्वसामान्य जनतेला झालेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करून महावितरण तर्फे सक्‍तीची होत असलेली वसुली व शेतातील वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा थांबवावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here