अमोल राउत यांची वंचित बहुजन आघाडी राजुरा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती

0
932

अमोल राउत यांची वंचित बहुजन आघाडी राजुरा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती

 

राजुरा, 22 जून : नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात काल शासकीय विश्रामगृह मध्ये वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराची बैठक पार पडली. या बैठकीत नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढायची भूमिका घेण्यात आली. तसेच निवडणूक कालावधी पर्यंत अमोल राउत यांची शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

राजुरा नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्षांची बांधणी जोमाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली असून सदर निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने काम करण्यासाठी तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी घेऊन समिती नेमण्यात आली. यात धनंजय बोर्डे, सच्चीदानंद रामटेके, राजू जुलमे, विजय जुलमे, सुभाष हजारे, किशोर रायपुरे, प्रभुदास वनकर, वासुदेव मालतीका यांची प्रभानिहाय समिती नेमण्यात आली.

यावेळी प्रभारी राजेश बोरकर, जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश लिंगंपल्लीवार, जिल्हा सचिव अमोल राऊत, जिल्हा महिला पदाधिकारी निशा ठेंगरे व अल्का मोटघरे,यावेळी तालुका कार्यकारणी अध्यक्ष सुशील मडावी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here