विरूर स्टेशन ग्राम पंचायत तर्फे “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत राष्ट्रीय ध्वज वाटप

0
552

विरूर स्टेशन ग्राम पंचायत तर्फे “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत राष्ट्रीय ध्वज वाटप

 

विरुर स्टे./राजुरा : राजुरा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या विरूर स्टेशन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे आज राष्ट्रीय ध्वज वाटप करण्यात आले. स्वातंत्रदिनाच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा उदात्त हेतूने या उपक्रमात साहभाग घेत विरूर स्टेशन ग्राम पंचायत तर्फे “हर घर झेंडा” अभियान अंतर्गत राष्ट्रीय ध्वज वितरण करण्यात आले. यांना ग्रामस्थ यांना राष्ट्रीय ध्वज देण्यात आले.

प्रधानमंत्र्यांनी अमृत महोत्सव निमित्ताने “हर घर झेंडा” संपूर्ण देशात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या अंतर्गत प्रत्येकांच्या घरी झेंडा फडकविण्याचा मानस आहे. यामुळे ग्राम पंचायत तर्फे सर्वांना ध्वज वाटप करण्यात येत आहे. “हर हर झेंडा” अभियान करिता ग्राम पंचायतचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी ग्राम वासियांना संदेश दिला आहे की, प्रत्येक घरी झेंडा लावून आपण सर्व नागरिक मिळून “हर घर झेंडा” लावून हा उपक्रम पार पाडू. ग्राम पंचायतीच्या सरपंच भाग्यश्री आत्राम, उप सरपंच श्रीनिवास इलनदुला तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य यांनी प्रत्येक वॉर्ड फिरून ग्रामस्थांना राष्ट्रीय ध्वजाचे वितरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here