अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करा :- प्रा.राजू तिमांडे यांची पालकमंत्री कडे मागणी
हिंगणघाट:-
पालकमंत्री हिंगणघाट येथे आले असता प्रा.राजू तिमांडे (माजी आमदार) यांनी अन्यायग्रस्त शिक्षकांना सोबत घेऊन पालकमंत्री यांना निवेदन दिले. शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेंशन योजना लागु आहे. व् नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना नविन पेंशन (DCPS) योजना लागु आहे. परंतु १ नोव्हेंबर २००५ पूर्वी १००% अनुदान नसल्याचे कारण पुढे करुन शासन या कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना हिरावून त्यांना DCPS योजना लागु करू पाहत आहे. हे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बरेच वर्ष विनानुदानवार सेवा देत आहे. सदर शिक्षकांना अति विलंबाने तत्कालीन शासनाच्या आर्थिक समस्येमुळे 2005 नंतर 100 % अनुदान मिळाले आहे. अनुदान देने हा शासनाचा भाग आहे त्यात कर्मचाऱ्यांची काय चूक ? आज यांना एवढ़या विलंबाणे DCPS योजना लागु करण्याचा निर्णय घेतला. यांचेपैकी बहुसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवा अल्प राहिल्यामुळे यांचे पगारातुन पुरेशी कपात होणार नाही व त्यात शासनाचा हिस्सा फारसा जमा होणार नाही. यांच्यापैकी काही सेवानिवृत्त तर काही मयतही झाले आहे. त्यांना तर कोणताच लाभ मिळणार नाही.
शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांनी जूनि पेंशन देण्यात अडथळा आणणारी दी १० जुलै २०२० रोजी काढलेली अधिसूचना यांचेवर अन्याय करणारी आहे. म्हणजेच कर्मच्याऱ्याना जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या प्रलंबीत निर्णयापूर्वी काढलेली अधिसूचना संविधानात्मक दॄष्ट्या अनुचित आहे.
म्हणुन महाराष्ट्र राज्य खासगी शाळा कर्मचारी नियामवली १९८१ मधे पूर्वलक्षी प्रभावाने बदल करणारी दि. १० जुलै २०२० ची अधिसूचना रद्द करून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुदानित , अंशता अनुदानित शाळा किवा तुकडीवर नियुक्त व् त्यानंतर १००% अनुदानं मिळालेल्या या कर्मचाऱ्यांना सर्व नियम व् अटीचे योग्य रीत्या पालण करुन व् सहानुभूतिपूर्वक विचार करुन या कर्मचाऱ्याना १९८२ ची जूनिच पेंशन योजना लागु करण्यात यावी अशी विनंती पालकमंत्री श्री सुनीलजी केदार यांना करण्यात आली. पालकमंत्री साहेबानी ही समस्या लवकर निकाली काढू असे अश्वासन दिले. यावेळी माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांच्यासोबत प्रा महेंद्र घुले, महेश माकडे, रमेश शेंडे, विजय नानोटकर, दिलीप पाटील, निसार शेख, कु विद्या खेडकर, कु सरला शिरपूरकर, देवेन गेडाम, प्रदीपजी महल्ले, प्रफुल पुलगमकर, प्रशांत पुसदेकर, जयंत बोदिले, लोमेश्वर सोनटक्के, धोटे सर व इतर अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
