मुंबईचे युवा पत्रकार शुभम पेडामकर समाजरत्न सन्मानपत्राने सन्मानित

0
375

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम

मुंबईचे युवा पत्रकार शुभम पेडामकर समाजरत्न सन्मानपत्राने सन्मानित

समाजात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारिता क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज पत्रकारिता क्षेत्रामुळे चहू दिशांचा आढावा लोकांना घरबसल्या मिळत आहे.

पत्रकारिता क्षेत्रात येऊन अत्यंत कमी वयात स्वबळावर स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या मुंबईतील फोर्ट परिसरात राहणाऱ्या युवा पत्रकार शुभम रेखा शंकर पेडामकर ह्यांना प्राईड ऑफ कोल्हापूर न्यूज चॅनेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अत्यंत कमी वयात केले यश संपादन.

वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी शुभम ह्यांनी एकूण 26 महिलांच्या मुलाखती घेऊन त्यांचा कार्याचा उलगडा केला आहे तसेच 20 पेक्षा अधिक करिअर संदर्भात मार्गदर्शनवर मुलाखती देखील घेतल्या आहेत.

त्याच बरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजन इ. विषयांवरील हजार पेक्षा जास्त बातम्या केल्या आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमधून ते स्वतःला नेहमी सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात .नुकतच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा आलेल्या दीपारंभ दिवाळी अंकासाठी संपादकीय साह्य म्हणून काम केले असून त्यात देखील बड्या मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

शुभम यांच्या कार्याबद्दल त्यांना आंबेडकर स्टुडंट असोसिएशन कडून आदर्श पत्रकार, अप्रतिम मीडिया, औरंगाबादकडून चौथा स्तंभ पुरस्कार, आदर्श मुंबई कडून आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाले आहेत आणि नुकताच मनुष्य विकास बळ यांच्या कडून राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय ते त्यांचे आई – बाबा (रेखा शंकर पेडामकर), भाऊ (अभिलाष) , शिक्षकां मध्ये उपप्राचार्य प्रा. डॉ. महेश पाटील सर आणि प्रा.डॉ. विमुक्ता राजे मॅडम यांना देतात. त्यांच्या सन्मानाबद्दल संपूर्ण स्तरावरून त्यांच्यावर कौतुकांचा व शुभेच्छांचा वर्षाव सध्या होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here