ओबीसी आंदोलनात सहभागी होणार -माजी मंत्री संजय राठोड

0
460

ओबीसी आंदोलनात सहभागी होणार -माजी मंत्री संजय राठोड

खा संजय जाधव यांनी घेतली भेट

 

आरूणा शर्मा

परभणी जिल्हा प्रतिनिघी

 

देशपातळीवर बंजारा समाजाची ओळख ओबीसी म्हणूनच असल्याचे मत माजी मंत्री संजयभाऊ राठोड यांनी व्यक्त केले ते परभणी येथे दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत सावळी विश्रामगृहावर संवाद साधतांना बोलत होते. राज्याचे माजी मंत्री संजयभाऊ राठोड हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून मंत्री पदाच्या राजीनाम्या नंतर राज्यातील बंजारा समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व सध्या ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय पाठींबा दर्शविन्या साठी त्यांनी राज्यभर दौऱ्याचे आयोजन केलेले असल्याचे स्पष्ट होत आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी असेही सांगितले की राज्यात आम्ही सुद्धा ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे सांगून ओबीसी आरक्षण रद्द झाल्या मुळे पदोन्नती,भर्ती प्रक्रिया,आदी बाबत तमाम ओबीसी बांधवावर अन्याय होत असून हाच अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने ओबीसी आंदोलनात सहभागी होत आहोत असे सांगून आमची क्रिमिलियरची मागणी ही जुनीच आहे.स्वातंत्र्या पूर्वी सुद्धा इंग्रजानी गुन्हेगारी जमात म्हणून विमुक्त भटक्या जमातींना मुक्त केले होते.आणि क्रिमिलियरची अट लागणार असे जाहीर केले होते.पण आता जाचक क्रिमिलियरची अट लावण्यात आलेली आहे.या सर्व बंजारा समाजा सह सर्व ओबीसी समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी तमाम ओबीसी समाजाने जागृत होऊन एक होण्याचे आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेत केले.आमच्या सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी साठी मी आमदार,राज्यमंत्री असताना सोडवण्याचा प्रयत्न केला.तसेच तांडा वस्त्यांना महसुली दर्जा भेटावा,स्वतत्र्य ग्रामपंचायतीचा दर्जा भेटावा,आज सुद्धा आमची मायमाऊली डोक्यावर गुंड घेऊन पाण्या साठी वणवण भटकत आहे.महसुल राज्यमंत्री असताना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचीत केले होते की सर्व तांड्यावस्त्याची माहिती देण्यात यावी.माझा लढा समाज बांधवा साठी मंत्रीपद असो की नसो पण पण सतत सुरू असेल असेही शेवटी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेत जिल्हाभरातून मोठया प्रमाणात बंजारा समाज उपस्थित होता.या बैठकीतच समाज बांधवानी समाजाच्या वस्त्या तांड्याच्या व्यथा मोठ्या प्रमाणात मांडल्या.

सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकात राठोड सह साधनाताई राठोड, सविता चव्हाण, कमलबाई चव्हाण, लक्ष्मीबाई आढे, खरुडे ताई,भागवत चव्हाण, संदीप राठोड,सुधीर राठोड, रामदास आढे, भागवत चव्हाण आदींची उपस्थिती होती.

 

मयत डॉ राहुल पवार कुटूंबीयाची घेतली भेट

माजी मंत्री संजय भाऊ राठोड यांनी आपल्या दौऱ्यातील वेळ काढून मयत डॉ राहुल पवार यांच्या कुटूंबियाची भेट घेऊन सांत्वन केले. 

विकासाचा महामेरू म्हणजे संजयभाऊ राठोड

माजी मंत्री संजय भाऊ राठोड म्हणजे विकासाचा महामेरू असल्याचे मत मंत्री राठोड यांचे सहकारी चंद्रकांत पवार यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते यांच्या विकास कामाचे प्रकाशन झाले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. यांच्या कडे निवेदने आले की ते निवेदन फाइलला न ठेवता त्या वर तात्काळ कार्यवाही करतात हेच सामाजिक कौशल्य पाहून मी यांच्या कडे वळलो व त्याची ताकद वाढवण्या साठी मी संजय भाऊ यांच्या सोबत असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here