पांढरकवडामध्ये नगर परिषद च्या सफाई कामगारांवर अन्याय

0
557

पांढरकवडामध्ये नगर परिषद च्या सफाई कामगारांवर अन्याय

पांढरकवडा शहर प्रतिनिधी
शेख तनविर

पांढरकवडा नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगाराच्या मागणीकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करण्याचा आरोप येथील कंत्राटी कामगारांनी केला आहे त्यामुळे आता दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न सफाई कामगारांनी केली आहे.

कोरोना संकट कालात आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रदीवस सेवा देणाऱ्या नगरपरिषद पांढरकवडा च्या सफाई कामगारांवर नगरपरिषदेमुळे उपासमारीची वेळ आली आहे.
सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मीळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झालं आहे.
देशात कोवीड 19 परिस्थिती असतांना देखील सफाई कामगारांनी वेतन मीळत नसतांना शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केल.
सफाई कामगारांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की जानेवारी 2021 या महीन्यात बील निघाले असुनही त्यांना वेतन अद्याप देण्यात आले नाही .मे महिन्याचा पगार सुद्धा मीळाला नाही.
पांढरकवडा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहे. सफाई कामगारांवर अन्याय होत आहे. सफाई कामगारांच्या समस्येची दखल नगरपरिषद प्रशासनाने घेतली पाहीजेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here