कोरोना काळात बँकेकडून कर्ज वसुली करतांना अति व्याज आकारणी

0
527

 

हिंगणघाट.तालुका प्रतिनिधी✍🏻 अनंता वायसे 

गेली दोन वर्षापासून कोरोना च्या नावाखाली सतत होत असणारे लॉकडाऊन सामान्य वर्गना चांगलेच महागात पडले. लॉक डाऊन मुळे सर्व नागरिकांचे व्यवसाय बंद पडले. आणि आर्थिक घडी पूर्ण कोलमडली असतांनी लोन फायनान्स कंपनी आणि बँकाकडून जास्त व्याज, चेक बाउंस चार्जेस लावून अतिरिक्त रक्कम आकारण्याचे षडयंत्र बँके आणि लोन कंपनी कडून सुरु आहेत. ग्राहकांना शिव्या आणि अति उड्डट भाषेत बोलून लोन भरा नाही तर वेगवेगळ्या धमक्या देऊन नागरिकांची मोठी पिळवणूक होत असताना सरकार झोपलेले आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहेत. दोन वर्षापासून सर्व छोटे मोठे उधोगधंदे बंद आहेत. परिवाराची आर्थिक घडी पूर्ण ऱ्हास झाली नागरिकांना जगावं कि मरावं अशी अवस्था या कोरोनामुळे झाली असताना सरकार कडून कोणतीच मदत जनतेला मिळाली नाही त्यातही मोठया प्रमाणात महागाही वाढवून जाणसामान्य नागरिकांचे जीवन जगणे हिरावून घेतले आहेत. अशी भयानक परस्थिती असतांनी आता जाणसामान्य नागरिकांनी आपले परिवाराचे पालनपोषण करावे कि बँकेच्या, फायनान्स कंपनीच्या लोन हप्ते भराचे असा मोठा पेच नागरिकांना समोर उभा आहेत. यावर लवकर सरकार नी निर्णय देऊन सर्व प्रकारचे लोन हप्ते दोन वर्षा पर्यंत थांवावे अन्यथा सर्व नागरिकांना आत्महत्या करण्यात खुली परवानगी द्यावी. असे मत नागरिकांनाकडून करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here