काेराेना रुग्णांच्या नातेवाईंकासाठी महिलांचा एक घास मदतीचा,अनेकांनी केली उपक्रमाची प्रशंसा !

0
764

विशेष प्रतिनिधी/किरण घाटे

चंद्रपूर :- -काेराेना महासंकटात काेराेना रुग्णांच्या भेटीसाठी येणां-या रुग्णांच्या नातेवाईंकांची गैरसाेय हाेवू नये या करीता महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेसच्या वतीने एक घास मदतीचा हा एक उपक्रम गेल्या कित्येक दिवसांपासून चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात राबविण्यांत येत आहे .

या उपक्रमात विदर्भ तेली समाज महासंघाच्या जिल्हा अध्यक्षा मीनाक्षीताई गुजरकर ,शहर अध्यक्षा चंदाताई वैरागडे, या शिवाय वंदनाताई खेळकर यांनी आपला सहभाग नाेंदविला.या वेळी काँग्रेस प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर ,नगरसेविका सुनीताताई लोढिया,नंदाताई आल्लूरवार,उपाध्यक्षा सुनीता धोटे,स्वाती त्रिवेदी,हर्षा चांदेकर, शीतल काटकर,शहर सचिव वाणी डारला,शहर सदस्य लता बारापत्रे आदीं उपस्थित होत्या.काल 200 पेक्षा अधिक कोविड रुग्णाच्या (गरजू )नातेवाईकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला .दरम्यान या उपक्रमाची शहरवासियांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here