भाडभिडी मोकासा येथील मालगुजारी तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन

0
578

 

चामोर्शी /सुखसागर झाडे

गडचिरोली/चामोर्शी:- टाटा ट्रस्ट व बि.पि.सि.एल च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प सुरू असून या अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील ग्राम पंचायत भाडभिडी मोकासा येथील मा.मा. तलाव सर्वे नं. २३४ मधील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

टाटा ट्रस्टने मृद व जलसंधारण तसेच जलसंवर्धनाचे काम हाती घेतले असून त्याअंतर्गत तलावाचे गाळ उपसा करणे व तलावांचा जलसाठा वाढविणे, त्याचबरोबर गावामध्ये शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची शाश्वती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. तलावाच्या माध्यमातून भात उत्पादनांसोबत मत्स्य पालनाला यामुळे प्रोत्साहन मिळेल. मत्स्यव्यवसायात रोजगार उपलब्ध होऊन दरडोई उत्पन्न वाढेल. लोकसहभाग वाढेल, परिणामी तलावांना जलवैभव प्राप्त होईल.

भाडभिडी मोकासा गावातील शेतकऱ्यांनी जलसंधारण व जलसंवर्धन करण्यासाठी एक प्रयत्न करून टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने पाण्याचे योग्य नियमन व्हावे व तलावाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निस्तार हक्क धारक शेतकऱ्यांचा पाणी वापर गट स्थापन केला.

पाणी वापर गटाचे अध्यक्ष एकनाथ कुनघाडकर यांचे हस्ते तलावाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आले. यावेळी सचिव धनराज शेट्ये, सदस्य चरणदास कुनघाडकर, नागेश्वर वैरागडे, विश्वनाथ गेडाम, गजानन कोमलवार, माजी सरपंच गणपतराव उरवेते, प्रोग्राम असोसिएट – सोशल मोबिलायझेशन टाटा ट्रस्टचे महेश आभारे, श्री कन्स्ट्रक्शन वर्धाचे आशीष हिवंज, पवन राऊत तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शेतकऱ्यांनी टाटा ट्रस्टचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here