चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा

0
286

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा

दोन गटात झाली स्पर्धा, शहरी-ग्रामीणसाठी एकूण १२ पुरस्कार घोषित

चंद्रपूर, ता.१२ । जगभरात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या परिस्थितीला चित्रबद्ध करण्यासाठी आणि शाळकरी मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ आणि मोहित मोबाईल यांच्या पुढाकाराने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी अ आणि ब असे दोन गट पाडले होते . अ गटात पाचवी ते सातवी आणि ब गटात आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात चंद्रपूर शहर आणि ग्रामीण अशा दोन विभागातील पहिल्या तीन स्पर्धकांना मोहित मोबाईलच्या वतीने योग्य पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय “कोरोना युद्ध आणि बाल मन” असा होता. विद्यार्थ्यांनी स्वतः काढलेली छायाचित्रे सादर करायची होती. या चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध कलाशिक्षक आणि चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी केले. सर्व विजेत्या विद्यार्थी चित्रकारांचे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांच्यासह समस्त कार्यकारिणी सदस्य आणि मोहित मोबाईलचे संचालक पंकज शर्मा यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेसाठी श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य जितेंद्र मशारकर आणि देवानंद साखरकर यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. चित्रकला स्पर्धेचे प्रत्यक्ष पारितोषिक वितरण कोरोना काळ लक्षात घेता आगामी काही दिवसांत करण्यात येणार असून विजेत्यांना त्याची माहिती कळविण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील विजेते स्पर्धक असे :-

गट ‘अ’- वर्ग ५ ते ७

शहर विभाग :-
प्रथम क्रमांक — अमीन फराना, माउंट कार्मेल शाळा , चंद्रपूर
द्वितीय क्रमांक — दिशा प्रवीण भटारकर , महाराणी विद्या मंदिर , चंद्रपूर
तृतीय क्रमांक — पूर्वा प्रमोद काकडे, माउंट कार्मेल शाळा , चंद्रपूर

ग्रामीण विभाग
प्रथम क्रमांक — सारिका शंभरकर , चंद्रपूर
द्वितीय क्रमांक — अवनी जीभकाटे , ऑर्डनन्स फॅक्टरी भद्रावती ,
तृतीय क्रमांक –प्राची गायकवाड , महात्मा गांधी विद्यालय , गडचांदूर

====================================
गट ‘ब’ — वर्ग ८ ते १०

शहर विभाग :-
प्रथम क्रमांक —तन्वी राजेश गडपल्लीवार , नारायणा विद्यालय , चंद्रपूर
द्वितीय क्रमांक –नुसरत नाजीर कुरेशी , बीजेएम कार्मेल अकॅडेमी, चंद्रपूर
तृतीय क्रमांक — श्रुती राजेश अलोणे , इंदिरा गांधी गार्डन स्कुल , चंद्रपूर

ग्रामीण विभाग
प्रथम क्रमांक —आयुष प्रेमसिंग जाधव , आदर्श हायस्कुल राजुरा
द्वितीय क्रमांक — सृष्टी सूर्यवंशी , लोकमान्य कन्या विदयालय, वरोरा
तृतीय क्रमांक — आर्थिका संजय उपाध्ये , माउंट कार्मेल सिनियर सेकंडरी स्कुल, घुग्गुस

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here