वंचित च्या ढाणकी शहराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार…?

0
510

वंचित च्या ढाणकी शहराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार…?

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ढाणकी/प्रतिनिधी ✍🏻मनोज राहुलवाड (मो. 8698978905)

यवतमाळ/उमरखेड/ढाणकी :- ढाणकी शहरातील राजकीय सूत्रे सद्यस्थितीत युवा वर्गाच्या हाती आले असल्याने ढाणकीतील राजकीय वर्तुळ चांगलेच चर्चेत आले आहे. मागील वर्षी भाजपने ढाणकी शहराध्यक्षाची धुरा रोहित वर्मा यांचेकडे तद्नंतर शिवसेनेने विजय (बंटी) जाधव यांचेकडे तर काँग्रेसने अमोल तुपेकर आणि राष्ट्रवादीने विजय वैद्य या युवा चेहऱ्यांकडे सोपविली. तसेच सर्वपक्षीय कार्यकारणी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात युवकांना संधी देण्यात आली. आता ढाणकीकरांचे लक्ष वंचित बहुजन आघाडी कडे लागले असून वंचित चा ढाणकी शहराध्यक्ष कोण होणार? सध्या ढाणकी शहरातील राजकीय वर्तुळात या चर्चेला उधाण आले आहे.
याविषयी आमचे ढाणकी शहर प्रतिनिधी यांनी वंचित चे यवतमाळ जिल्हा महासचिव प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले, आमचा वंचित बहुजन आघाडी च्या शहराध्यक्षपदी साफ सुत्रा, क्लीन इमेज असलेला, बुद्धिजीवी ओबीसीचा युवा चेहरा देण्याचा प्रयत्न सुरू असून, तो सर्वसमावेशक वंचित घटकांना न्याय मिळवून देणारा असावा. लवकरच या विषयीचे गुढ ऊकलल्या जाईल. व तसेच वंचित बहुजन आघाडीचे व्हिजन ज्या वंचित समाजाला राजकीय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात वारंवार डावलण्यात आलं, मग ते एससी, एसटी, ओबीसी, मायक्रो ओबीसी जे वंचित आहे त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे. सत्तेपर्यंत पोहोचवीने होय. ढाणकीत होणाऱ्या पुढील नगरपंचायत निवडणुकीपर्यंत मजबूत पक्षबांधणी करून प्रत्येक प्रभागात उमेदवार निवडून आणण्याकरिता व तसेच विधानसभा निवडणुकी करीता सुद्धा जोरदार तयारी सुरू असून, ढाणकी च्या वंचित च्या कार्यकारणी मध्ये सुद्धा बहुतांश वंचित व युवा घटकास प्राधान्य राहील. आणि सर्व बहुजनांची मोट बांधणी करून, आमचे मार्गदर्शक नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर वंचित बहुजन आघाडी ढाणकी शहराध्यक्षपदी नवीन युवा चेहरा कोणता? याची उत्सुकता ढाणकी च्या राजकीय वर्तुळात वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here