अँड. मारोती कुरवटकर यांच्या वाढसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

0
588

अँड. मारोती कुरवटकर यांच्या वाढसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

५० रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

राजुरा, अमोल राऊत (२५ जुलै) : अँड. मारोती गणवतराव कुरवटकर यांच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्ताने आज श्रीराम मंदिर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरात ५० जणांनी रक्तदान करत ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या मोहिमेत सहभाग घेतला.

 

रक्तदान शिबिराचे उदघाटन टेंबुरवाही येथील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा वर्कर किरणताई कैलासगेवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य वरकड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपीपरीचे माजी नगराध्यक्ष संजय झाडे, रक्त समाजसेवा अधिक्षक संजय गावित, मंगीचे उपसरपंच वासुदेवराव चापले, माजी सरपंच लहुजी चहारे, दशरथ चापले, गणपतराव कुरवटकर आदी मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी अँड. मारोती कुरवटकर म्हणाले कि वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. परंतु आज संपूर्ण जग कोव्हिड-१९ या महामारीने ग्रस्त असून आरोग्य सेवेची समाजाला नितांत गरज आहे. अशा संकट समयी रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याच हिरीरीने रक्तदान होणे गरजेचे आहे. याकरिताच सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना अँड. कुरवटकर यांनी भविष्यात आपला देहदान करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रास्ताविक उमेश पारखी यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर झाडे यांनी तर आभार रामरतन चापले यांनी मानले. सदर शिबिराच्या यशस्वीततेकरिता रविंद्र कुरवटकर, प्रेमसागर राऊत, भाऊराव भोंगळे, संदीप घोटेकर, रोशन येवले, सुधाकर धोटे, गुरू गेडाम, खुशाल लोणारे, शुभम खेडेकर, सर्वेश मांडवकर, अमोल राऊत यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here