राजुरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी कार्यकारणी गठीत करण्यासंबंधी मुलाखत कार्यक्रम संपन्न

0
303

राजुरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी कार्यकारणी गठीत करण्यासंबंधी मुलाखत कार्यक्रम संपन्न

राजु झाडे : राजुरा तालुक्यात संत नगाजी महाराज सभागृह येथे वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी गठीत करण्यासंबंधी आज मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या उद्देशाने पक्ष विस्ताराकरिता जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यतत्पर नव्या उमेदीच्या तालुक्यातील पदाधिकारीची निवड करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राज्य महासचिव कुशलभाऊ मेश्राम, विदर्भ संयोजक समन्वयक राजुभाऊ झोडे, चंद्रपूर जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, धीरज बाम्बोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील अमोल राऊत, प्रा. जांभुळकर, भगीरथ वाकडे, आनंदराव अंगलवार, नवनिर्वाचित कविटपेठ ग्रामपंचायत सदस्य आनंदराव देठे, रवी बावणे, सुभाष रामटेके, सुशील मडावी, अभिलाष परचाके, वीरेंद्र पुणेकर, किशोर रायपुरे, विजय जुलमे आदी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here