लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या दूर करण्याचा काम करतात मात्र लालगुडा ग्रामपंचायत सदस्य या नागरिकांना देत आहेत त्रास

0
723

लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या दूर करण्याचा काम करतात मात्र लालगुडा ग्रामपंचायत सदस्य या नागरिकांना देत आहेत त्रास

वाणी/प्रतिनिधी : लालगुडा येथील ग्रामपंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य यांनी स्वतःच्या घरचे सांडपाणी रस्त्यावर सोडले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांना सांड पाणी रस्त्यावर सोडू नका असे सांगितल्यास त्या नागरिकांशी वाद करतात. ग्रामपंचायत सरपंच यांनी याबाबत कोणतीच दखल का घेतली नाही तसेच ग्रामपंचायत चे सचिव यांची सुध्दा जवाबदारी आहे. गावात स्वच्छता ठेवणे, आरोग्याच्या दृष्टीने जनतेत जागरूकता निर्माण करणे. मात्र लालगुडा येथील वार्ड क्रमांक 2 च्या ग्रामपंचायत सदस्य या स्वतः परिसरातील आरोग्य घराब करत असून घाणीचे साम्राज्य पसरवीत आहे.

कोरोना महामारीत सरकार म्हणते स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, यासाठी पंचायत समिती गावात जाऊन जागृती करतात. परंतु वणी पंचायत समिती चे या गावाकडे चांगलेच दुर्लक्ष दिसत आहे. पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, गटविकास अधिकारी राजेश गायणार यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लालगुडा परिसरात अनेक तलाठी, ग्रामसेवक राहतात. त्यांचे सुध्दा आरोग्य खराब होऊ शकते. त्यांनी सुध्दा या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांची मागणी आहे. तसेच नवनिर्वाचित सदस्य यांची दादागिरी वाढत असून जनतेच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे अशी नागरिक चर्चा करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here