वीज कापायला गेलेल्या विद्युत कर्मचाऱ्यास मारहाण

0
968

वीज कापायला गेलेल्या विद्युत कर्मचाऱ्यास मारहाण

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

बऱ्याच महिन्याचे थकित असलेले विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळे वीज कापायला गेलेल्या विद्युत कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना दिनांक 12 फेब्रुवारी रोजी गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध धाबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाकडावून काळातील वीज बिल माफ होणार या आशेवर सामान्य जनता राहिली तर दुसरीकडे मात्र महावितरण कंपनीने थकीत बिल न भरणाऱ्या ग्राहक विरुद्ध विज कापण्याची मोहीम सुरू केली असून गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे धाबा विद्युत वितरण केंद्र अंतर्गत काम करीत असलेले कर्मचारी गणेश सुरेश चापले यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून डोंगरगाव येथे गेले. बऱ्याच महिन्यापासून विज बिल न भरलेले ग्राहक मुक्‍ताबाई मुसने यांची वीज तेथील रहिवासी साईनाथ मारुती फुल मारे हे वापरीत होते त्यांना कंपनीकडून फोन करून बिल भरण्याची अनेकदा सूचना करण्यात आली. मात्र त्यांनी बिलाचा भरणा केला नाही अशातच त्यांची वीज कापायला गेलेल्या कर्मचारी हनुमान मंदिराजवळ गावातील दुसऱ्या एका ग्राहकाचे विज बिल घेत असताना अचानक साईनाथ फुलमारे यांनी आलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ केली .मी बिलाचा भरणा केला असून माझे वीज कापण्यात आली असे म्हणत लाकडी दांड्याने कर्मचारी धनेश चापले यांच्या डोक्यावर वार केला त्यात ते जखमी झाले. गावात एकच गोंधळ उडाला सदर प्रकरणाची माहिती चाफले यांनी आपले वरिष्ठ अधिकारी लेकुरवाळे यांना फोनवर ती माहिती दिली.सोबतच
धाबा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली.आरोपी साईनाथ मारोती फुलमारे यांच्याविरुद्ध भां. द.वी. 353,332,504 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here