शेतकऱ्यांनी ठरवलेल्या भारत बंदच्या समर्थनात गोंडपिपरीत काँग्रेसचे धरणे आंदोलन

0
656

शेतकऱ्यांनी ठरवलेल्या भारत बंदच्या समर्थनात गोंडपिपरीत काँग्रेसचे धरणे आंदोलन

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

केंद्रसरकारने घाईघाईने कुणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाही.या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.हे कायदे रद्द करावे यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी ४ महिन्यापासून आंदोलन करत आहे.
शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आंदोलनाला पाठींबा देत आज भारत बंद ची हाक दिली. भारत बंदच्या समर्थनात गोंडपीपरी काँग्रेस कमेटी ने पाठिंबा देऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून अन्यायी कृषी कायदे रद्द करन्याची मागणी तशीलदारांमार्फत पंतप्रधान यांना करत इंधन ,गॅस वाढीचा देखील निषेध करण्यात आला. यावेळी गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुकाराम झाडे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक रेचनकर, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष बंडावार,जिल्हा सचिव कमलेश निमगडे, माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर, माजी तालुकाध्यक्ष राजिवसिंह चंदेल,विधानसभा प्रमुख सचिन फुलझेले, सरपंच देविदास सातपुते,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष विनोद नागापुरे, अस्लम शेख, नगारे,राजू झाडे,सुरगावचे सरपंच पोचुमल्ला उलेंदला ,रेखा रामटेके ग्रा. प.सदस्य,अनिल झाडे,अनुसूचित जाती जमाती सेल तालुका अध्यक्ष गौतम झाडे,माजी उपसरपंच अभय शेंडे, माजी उपसरपंच विलास चौधरी, माजी नगरसेवक प्रवीण नरशेटीवार यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here